18 गाव आगरी युवा संघाच्या क्रिकेट स्पर्धेत आगरवाडा आगरी समाज संघ विजयी

।बोर्लीपंचतन । प्रतिनिधी ।
आगरी समाजाचा प्रसार व प्रचार व्हावा तसेच आपल्या आगरी युवकांना क्रीडामंच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने 18 गाव आगरी युवा संघाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आगरी हृदय सम्राट स्वर्गीय दि.बा.पाटील क्रिडांगण, सेक्टर 21 कामोठे येथे केले होते.
या स्पर्धेला स्थानिक नगरसेविका अरुणा भगत, समाज सेवक प्रदीप भगत, संजय ठाकुर, डॉ.अरुणकुमार भगत, भरत म्हात्रे, नरेश चालके, अध्यक्ष संतोष पाटील आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत 32 आगरी संघ सहभागी असून अंतिम विजयी आगरवाडा आगरी समाज संघ व उपविजेता वारळ आगरी समाज संघ झाला असून मालिकावीराचा बहुमान सिद्धेश नाक्ती याने पटकाविला. या स्पर्धेत आपल्या सर्व युवकांना दुपारच्या जेवणाची मोफत सुविधा समाजसेवक संजय ठाकुर व मैदान नियोजनासाठी विशेष सहकार्य प्रदीप भगत यांचे लाभल्याबद्दल त्यांचे विशेष आभार संघटनेचे अध्यक्ष धनंजय चौलकर, उपाध्यक्ष हरीश पयेर व सुहास पाटील, कार्याध्यक्ष गोविंद भायदे यांनी मानले. या स्पर्धेचे समालोचन संदेश पाटील, प्रशांत भायदे व पाटील यांनी केले

Exit mobile version