पाककला स्पर्धेत आगरवाडा शाळा अव्वल

| म्हसळा | वार्ताहर |

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी व्हावी असा उद्देश असून, सदर स्पर्धा शालेय स्तर, केंद्र स्तर आणि तालुका स्तर अशा संपन्न झाल्या. या स्पर्धेत आगरवाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.

शासनाच्या आदेशानुसार शाळांमध्ये परस बागा विकसित करून त्याचा मध्यान्ह आहारात वापर व्हावा आणि तृणधान्यविषयक जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने तालुका पातळीवरील पाककला स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती च्या सभागृहात भरविण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या आगरवाडा शाळेला पाच हजार रोख पारितोषिक, द्वितीय क्रमांक मराठी शाळा नं. 1 ला साडेतीन हजारांचे पारितोषिक, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या सूरई शाळेला अडीच हजारांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमांस प्रशासन अधिकारी हेमंत माळी, कक्ष अधिकारी ईश्वर चौधरी, कृषी अधिकारी बाक्कर, जगदीश घोसाळकर, प्रकाश कोठावळे, मोरे, अनिता दानवे, गारेढे, रेणुका पाटिल, सलाम कौचाली, दिपक पाटिल, संदिप भोनकर, किशोर पैलकर आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातील एकूण 11 केंद्रांपैकी 18 शाळांनी स्पर्धेत भाग घेतला.

Exit mobile version