मालमत्ताकराविरोधात आक्रमक ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

। पनवेल । वार्ताहर ।
पालिकेने लादलेल्या मालमत्ता करा विरोधात पालिकेत समाविष्ठ ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनकडून पालिका मुख्यालयासमोर शुक्रवार ( ता.16) बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून, कडकडीत उन्हात देखील ग्रामस्थ आंदोलनावर ठाम असल्याचे पहायला मिळत आहेत.पालिकेने ग्रामस्थांवर लादलेल्या मालमत्ताकराविरोधात नवी मुंबई 95 गावं नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती व संलग्न संस्थांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पालिकेने नागरिकांवर लादलेल्या मालमत्ताकराविरोधा सोमवार पासून सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला पालिका हद्दीतील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी पाठिंबा दिला असल्याने आंदोलनात महाविकास आघाडी तील मित्र पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

तसेच दररोज विविध ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली आहे.आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जुई, कामोठे आणि नवपाडा गावातील ग्रामस्थ आंदोलन स्थळी उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शिक्षक आमदार बाळाराम पाटील, रायगड शिव सेना ( उद्धव ठाकरे गट)जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलकांनी जपल सामाजिक भान
आंदोलनात सहभागी आंदोलकांनी आंदोलना दरम्यान सामाजिक भान राखल्याचे पाहायला मिळाले. कडकडीत उन्हात आंदोलकांसाठी पाण्याची सोय म्हणून पुरवण्यात आलेल्या आणि रिकाम्या करून टाकण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्या एकत्र करून त्यांची विल्हेवाट हे आंदोलक लावताना दिसून येत होते.

Exit mobile version