मालमत्ता कराविरोधात आंदोलन

| पनवेल । वार्ताहर ।

मालमत्ता कराविरोधात काळुंद्रे ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोधाची भूमिका घेतली आहे. वाढीव मालमत्ता कर प्रणाली अन्यायकारक असल्याचे सांगत काळुंद्रे ग्रामस्थांनी असहकार आंदोलन पुकारत पालिकेविरोधात निषेधाची भूमिका घेतली आहे.

काळुंद्रे प्रकल्पग्रस्त संघटनेने यासंदर्भात गावाच्या मुख्य चौकात असहकार आंदोलनाचे बॅनर्स लावले आहेत. सर्वपक्षीय राजकीयपदाधिकार्‍यांनी गावाच्या चौकात आपले बॅनर्स लावू नयेत तसेच पालिकेच्या माध्यमातून गावात कोणतीही विकासकामे करू नयेत, अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. वेळ पडल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका काळुंद्रे मुख्यालयासमोर धरणे मालमत्ता करासंदर्भात कामोठे येथे नुकतीच नवी मुंबईत 95 गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पनवेल महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

काळुंद्रे प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय घरत यांनी, काळुंद्रे गाव भूमिहीन गाव आहे. गावाच्या समस्या, रोजगाराचा प्रश्‍न मोठा आहे. याबाबत कोणताही विचार न करता मालमत्ता कराच्या माध्यमातून आर्थिक बोजा ग्रामस्थांवर टाकला जात असल्याने आमचा वाढीव मालमत्ता कराला विरोध राहणार असल्याने आमची ही भूमिका आहे. असे त्यांनी सांगितले आहे .

Exit mobile version