तहसीलदार-नायब तहसीलदारांचे आंदोलन

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार 3 एप्रिलपासून आपल्या विविध मागण्या करिता बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर निवेदन देण्यात आले आहे. या निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सचिन शेजाळ तहसीलदार महसूल, कोषध्यक्ष विशाल दौंडकर, तहसीलदार सामान्य गोविंद वाकडे, नायब तहसीलदार मनोज गौतरणे, नायब तहसीलदार रविंद्र सानप, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे आदिंसह नायब तहसीलदार उपस्थित होते. कर्मचार्‍यांच्या पाठोपाठ आता तहसीलदार व नायब तहसीलदार संपावर जात असल्यामुळे नागरिकांचे होणार असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version