। रायगड । प्रतिनिधी ।
देशसेवेसाठी सैन्यात भरती झालेल्या तरुणाला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा योग् आला. भ्रमणध्वनीची घंटी वाजली समोरून आवाज आला. हॅलो, माय नेम इज पार्थ असे शब्द कानावर पडले आणि थोडावेळ माय नेम इज बॉण्ड या डायलॉगची आठवण झाली. वाटलं आजची तरुणाई देशसेवेसाठी इतकी वेडी आहे.
भारतीय लष्करात अग्निविर बनण्याचे स्वप्न उरात बाळगून सत्यात उतरवणार्या तरुणांमध्ये अलिबाग तालुक्यातील बोरघरच्या पार्थचे नाव इतिहासात कोरले जाणारे आहे. जीवन सार्थकी लावायचे असेल तर देशसेवा हा एकमेव उत्तम पर्याय आहे असे अग्निविर पार्थ सांगतात.आजची तरुणाई संगणकीय युगात फॅशनच्या दिशेने झुकलेली असताना केवळ आणि केवळ मातृभूमीच्या रक्षणासाठी निधड्या छातीने पुढे येणारे तरुणदेखीलआदर्श ठरत आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधून पदवीधर बनण्यापेक्षा प्रथम देशाचे पैकी बनण्याचा निर्धार करणार्या तरुणांची संख्या वाढताना दिसत आहे. असेचध्येयवेड्या तरुणाने आपले आयुष्य देश सेवेसाठी वेचण्याचा निर्णय घेऊन मित्रांसह गावकर्यांनादेखीलबुचकळ्यात पाडले. शालेय शिक्षण घेतानाचसैन्यात भरती होऊन देश सेवाकरण्याचा निर्धार पक्का करणार्या पार्थ ध्रुव म्हात्रे यांनी आपले सैन्य भरतीसाठी अपेक्षित असणारे शिक्षण कधी पूर्ण होते याची प्रतीक्षा केली होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बोरघरचेसुपुत्र पार्थ म्हात्रे यांनी सैन्यातील अग्निविर बनण्यासाठी तयारी सुरु केली. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले नाही.अग्निविर बनण्यासाठी प्रयत्न असफल ठरत आहेत. म्हणून पार्थ यांनी नाद सोडला नाही. त्यांनी अधिक चिकाटीने आणि जिद्दीने सैन्यात भरती होण्यासाठीचासराव सुरु ठेवला.
तिसर्या प्रयत्नामध्ये त्यांनी सांताक्रूझ कलीना येथे झालेल्या भरतीमध्ये अग्निविर बनण्याचे स्वप्नसत्यात उतरवले, 2023 मध्ये पार्थ म्हात्रे यांची निवड अग्निविर म्हणून झाली. शालेय शिक्षण बोरघर, माध्यमिक शिक्षण भिलजी बोरघर आणि उच्च माध्यमिक शिक्षण रेवदंडा येथे घेतलेल्या पार्थ यांना सैन्यात जाण्याचे दरवाजे उघडले. त्यांना लगेचच प्रशिक्षणासाठी गोवा येथे पाठविण्यात आले. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता ते देशाच्या पश्चिम बंगाल सीमेवर कर्तव्यावर तैनात आहेत. प्रशिक्षण आणि पोस्टिंग झाल्यानंतर एका वर्षाने अग्निविर पार्थ म्हात्रे यांनी आपल्या बोरघर गावी प्रस्थान केले. गावात दाखल होताच गावाच्या वेशीवरूनच त्यांची मिरवणूक काढण्यात आली. बोरघर गावाच्या एसटी स्थानकावर त्यांची आई संध्या, वडील ध्रुव, बहीण, आजी-आजोबा यांनी त्यांची ओवाळणी केली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.