बळीराजाला आस काळ्या मातीची…

 मशागतीच्या कामाला सुरुवात

| अलिबाग । प्रतिनिधी ।

यात्रा उत्सवांचा हंगाम संपल्यावर शेतकरी मशागतीच्या कामाला सुरुवात करतात. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून मशागतीच्या कामांना सुरुवात झाली. जिल्ह्यातील शेतकरी मशागतीची कामे करण्यामध्ये मग्न होऊ लागला आहे. त्यात बांधबंदिस्ती करणे, राब जाळणे, शेतावर साचलेला पाला पाचोळा गोळा करणे अशा अनेक प्रकारची कामे शेतकर्‍यांनी सुरु केली आहेत.

जिल्हयामध्ये सुमारे 95 हजार हेक्टर क्षेत्र भात पिकाचे आहे. 20 लाखापेक्षा अधिक शेतकरी भातशेती करतात. सुमारे 97 टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावर भातशेती करतात. त्यामुळे यंदा पावसाळा सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक राहिला आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांनी पावसाळ्यापुर्वीची कामे सुरु केली आहेत. बांधबंदिस्तीसह अनेक कामांमध्ये शेतकरी रमू लागले आहेत.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून तापमान वाढत आहे. उन्हाचे काम करताना  शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे काही शेतकरी पहाटे तर काही शेतकरी संध्याकाळच्यावेळी चारनंतर शेतावर जाऊन शेती मशागतीची कामे करण्यावर भर देत आहेत. बांधबंदिस्ती, बांधावरील सुकलेले गवत पडलेला पाळा पाचोळा गोळा करून राबात टाकणे. त्यानंतर राब जाळणे, शेतामध्ये पडलेली बोरी सह अन्य काटेरी फांद्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावणे अशा अनेक प्रकारची कामे शेतकरी करू लागले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कामे पूणर्र् होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version