महाजने येथे कृषी संजीवनी सप्ताह

| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मौजे महाजने येथ कृषी संजीवनी सप्ताहाच्या पहिल्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास बेलोशी  उपसरपंच  गीतांजली पारंगे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, प्रभारी अलिबाग तालुका कृषी अधिकारी श्रीमती सावंत, कृप श्री.गरांडे तसेच कृषी सहाय्यक श्री.मिसाळ, श्री.बनबरे, श्री.कवळे उपस्थित होते. या कार्यक्रमात संबंधित अधिकार्‍यांकडून उपस्थितांना विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार आणि मूल्य साखळी बळकटीकरण या विषयांबाबत तसेच विविध कृषी योजनांसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version