| पनवेल | वार्ताहर |
गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य उग्र वास येतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.
रात्री या परिसरात भरपूर प्रमाणात उग्र वास येत असतो त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेले आहे. सध्या आपल्या परिसरात इतर साथीचे रोगही डोके वर काढत आहेत. यापुढे अशा प्रकारच्या केमिकल्स सदृश्य वायुप्रदूषणामुळे श्वसनाचे आजाराचे प्रमाण वाढण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. या संदर्भात त्यांनी विभाग अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पनवेल आणि पनवेल महानगरपालिकेला या गंभीर विषयात लक्ष देऊन ठोस पावले उचलून रात्रीच्या वेळी या येणाऱ्या वासाची चौकशी करून योग्य तो निर्णय त्वरित घेण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी महापालिकेकडे केली आहे.