| मुंबई | प्रतिनिधि |
टागोर नगर मित्र मंडळ व्यायाम शाळा विभागाने ‘टागोर नगर श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ताडदेव व्यायाम शाळेच्या अजय कडुने ‘टागोर नगर श्री’चा खिताब पटकावला. तर, पेतीत व्यायाम शाळेचा विजय गोडसे हा बेस्ट पोझर ठरला.
ऍम्युचर बॉडी बिल्डिंग असो.च्या मान्यतेने टागोर नगर तर्फे कबड्डी स्पर्धेनंतर ‘टागोर नगर श्री’चे राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा विक्रोळी (पूर्व) येथील साईबाबा मंदिर शेजारील मैदानात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नामवंत शरीर सौष्ठव स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थानिक नगरसेवक राजेश सोनावळे, मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, कार्याध्यक्ष गिरीश पवार, सचिव सुरेश परब, कोषाध्यक्ष महेंद्र भास्कर यांच्या उपस्थितीत पार पडला. विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील लहान गटात प्रथम क्रमांक कौस्तुभ राणे, द्वितीय क्रमांक सुरेंद्र डांगवळ व तुतीय क्रमांक अविनाश राजपूत, मध्यम गटात प्रथम क्रमांक मुकुंद मांजरेकर, द्वितीय क्रमांक निहाल भुवड व तृतीय क्रमांक अविनाश गोरीवले, उंच गटात प्रथम क्रमांक शार्दूल हरियान, द्वितीय क्रमांक रेंडोल्फ डिसोझा व तृतीय क्रमांक अमित निकम यांनी पटकावला. तर, अधिक उंच गटात प्रथम क्रमांक अजय कडू, द्वितीय क्रमांक प्रशांत कांबळे व तृतीय क्रमांक कार्तिक शेलटकर यांनी पटकावला.
अजय कडू ठरला ‘टागोर नगर श्री’
