जनमोर्चा संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी आजेश नाडकर

। माणगांव । प्रतिनिधी ।
ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चा संघटनेच्या रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदी माणगाव तालुक्यातील गारळ येथील रहिवासी तथा तालुका पत्रकार संघाचे ज्येेष्ठ सल्लागार आजेश शांताराम नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हीजे एनटी जनमोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप व संस्थापक महासचिव बालाजी शिंदे, उपाध्यक्ष राजू साळुंखे, अनिल पवार, निलेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरिय कार्यकारिणीची बैठक मराठी पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाली. यावेळी विविध पदाधिकार्‍यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्ष पदावर माणगांव येथील अजेश नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर सक्रीयपणे कार्यरत राहून वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार अशी ग्वाही अजेश नाडकर यांनी दिली. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात असुन माणगाव तालुका पत्रकार संघाने विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version