साजगाव उपसरपंचपदी अजित देशमुख

| खोपोली | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील ग्रामीण बाजारपेठ व आर्थिक सक्षम समजल्या जाणार्‍या साजगाव ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व माजी सभापती यांचा वरचस्मा पुन्हा एकदा दिसून आला. राष्ट्रवादीचे अजित देशमुख यांची शेवटच्या क्षणाला बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. साजगाव मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून उप सरपंच पदासाठी रमेश पाटील यांनी अर्ज भरला होता. तसेच राष्ट्रवादी कडुन अजित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.

रमेश पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यावर राष्ट्रवादीचे अजित देशमुख यांची बिनविरोध निवड सरपंच विनोद खवळे यांनी घोषित केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवनिर्वाचित सरपंच विनोद खवळे यांनी काम पहिले तर सचिव म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सल्लागार हनुमंत शेट पिंगळे यांनी सरपंच विनोद खवळे व अजित देशमुख यांचे अभिनंदन केले. 11 पैकी 6 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस – महाविकास आघाडीचे निवडून आले तर शिंदे गटाचे 5 सदस्य निवडून आले होते. यावेळी अजित देशमुख, भालचंद्र पाटील, दिलीप सुखदरे, जमन भोईर, मीनल पाटील, उज्वला गायकवाड, या सत्ताधारी सदस्या सहित रमेश पाटील, प्रज्ञेश खेडेकर, प्रतीक्षा देशमुख, नाजुका करणूक, रविना म्हात्रे हेही मान्यवर सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष व सभापती एच आर पाटील, शेखर पिंगळे, भूषण पाटील यांच्या सहित साजगाव चे माजी सरपंच भाऊ गायकवाड यांच्या सहित, मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष मनीष खवळे व खवळे कुटुंबीय, सागर कर्नूक, एच आर पाटील, शेखर पिंगळे, भूषण पाटील यांच्या सहित साजगावचे माजी सरपंच भाऊ गायकवाड, सागर कर्नूक, प्रफुल्ल देशमुख तसेच शिवाजी देशमुख, मोहन शिंदे, चंद्रकांत खेडेकर, अनंता बोंबे, विनोद गायकवाड, आनंद गायकवाड, रवींद्र बोंबे, राजू दिपक गायकवाड, दिपक गायकवाड, प्रशांत पाटील, राजेंद्र नारायण पाटील, तसेच सरपंच विनोद खवळे यांचे नातेवाईक व अजित देशमुख यांचे नातेवाईकानी मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Exit mobile version