अजित पवार म्हणतात, अर्थखाते आज आहे उद्या नाही

| मुंबई | प्रतिनिधी |

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. आज माझ्याकडे अर्थखाते असल्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, पुढे अर्थखाते टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात दिसत आहे. म्हणून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.

खडसेंच्या विधानाला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट धरून राहावे, आमची काळजी करू नये. राष्ट्रवादीत राहिलेले सुद्धा आमच्याकडं येत आहेत. आमच्याकडे येण्यासाठी फार हात पाय जोडू नका. अजित पवार यांच्याबरोबर येण्यासाठी एकनाथ खडसे काय करत आहेत, याची मला कल्पना आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, अजित पवार सावध असल्याचे मला समाधान आहे. अजित पवार स्वखुशीनं सरकारमध्ये सामील झाले आहेत. अन्याय होत असल्यास अजित पवार विचार करतील.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. भविष्याचे कुणालाच काही माहिती नसतं. त्यामुळे अजित पवार यांचे वक्तव्य नैसर्गिक आहे. हे राजकीय विधान नाही,असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version