महादेववाडीत अखंड हरीनाम सप्ताह

। कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील महादेववाडी कोलाड येथे रामनवमी निमित्ताने बुधवार (दि.17) ते शनिवार (दि.20) पर्यंत आलिबागकर महाराज, गोपाळ वाजे, धोंडू कोल्हाटकर, सिताराम दाजी खामकर, बाबु बाईत, श्रीधर बाईत यांच्या कृपाआशिर्वादामुळे अखंड नाम यज्ञ सोहळा नारायण वाजे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त बुधवार (दि.17) रोजी सकाळी बबन वांजळे यांचे किर्तन, रात्री नित्यानंद मांडवकर यांचे किर्तन. गुरुवार (दि.18) रोजी रात्री पुरुषोत्तम पाटील यांचे किर्तन. शुक्रवार (दि.19) रोजी रात्री पुरुषोत्तम पाटील यांचे किर्तन. शनिवार (दि.20) रोजी सकाळी विजयानंद तेलंगे यांचे काल्याचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version