| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशी तर्फे सोनगाव येथे (दि.13) एप्रिल ते (दि.20) एप्रिल या कालावधीत विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्वा.सु.गुरूवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे, धोंडूबाबा कोलाटकर यांच्या कृपार्शिर्वादाने व ह.भ.प.गुरूवर्य नारायण महाराज वाजे मठाधिपती पंढरपूर ह.भ.प.वै.गुरूवर्य सखाराम महाराज निकम(भाऊ), ह.भ.प.गुरूवर्य पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व ह.भ.प.रघुनाथ महाराज भोकटे तसेच ह.भ.प.मारूती महाराज साळवी यांच्या प्रेरणेने संपन्न होणार्या या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 9 ते 12 व दु.2 ते 4 ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, सायं.4 ते 5 प्रवचन, 5:30 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 हरिकिर्तन व महाप्रसाद तद्नंतर जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या सप्ताहात शनिवार (दि.13) एप्रिल रोजी ह.भ.प.नारायण महाराज वाजे पंढरपूर, रविवार (दि.14) एप्रिल रोजी ह.भ.प.नित्यानंद महाराज मांडवकर चणेरा, सोमवार (दि.15) एप्रिल रोजी ह.भ.प.संजय महाराज वेळूकर सातारा, मंगळवार (दि.16) एप्रिल रोजी ह.भ.प.निवृत्ती महाराज पाटील पनवेल, बुधवार (दि.17) एप्रिल रोजी सकाळी 10 ते12 श्रीराम जन्मानिम्मित्त ह.भ.प.महादेव महाराज सानप गावठाण, तर रात्रौ.ह.भ.प.गुरूवर्य पुरूषोत्तम महाराज पाटील धाटाव, (दि.18) एप्रिल ह.भ.प.श्रवण महाराज अहिरे नाशिक, शुक्रवार (दि.19) एप्रिल ज्ञानेश्वर महाराज पारधी डोंबिवली, शनिवार (दि.20) एप्रिल स.10 ते 12 ह.भ.प.दिनेश महाराज कडवट वांदोली यांचे कल्याचे किर्तन आदी संपन्न होणार आहेत. तर या सप्ताहाचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ सोनगाव तसेच तरूण सोनगाव मंडळ अधिक मेहनत घेत आहेत.