। महाड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा राज्य उर्दू शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.5) महाडमधील गांधारी नाका येथील समाजमंदिरामध्ये संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम. ए. गफ्फार होते.
यावेळी भविष्यकाळाचा वेध घेऊन रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर महाडचे आदर्श शिक्षक अकलाक उमर गोडमे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यक्रमास मुस्ताक इसहाक तांबे, अहमद हसन मिया नाडकर,बशीर अब्दुल गफूर प्रकार, शौकत ऐनरकर, शेख जैनुल आबेदिन हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त जिल्हा अध्यक्ष सिराज पेवेकर, अब्दुल गफार देशमुख व इतर उत्कृष्ट काम करणार्या मुख्याध्यापिका व मुख्याध्यापक यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले.