अक्षत ओसवाल यांची शोभयात्रा

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत शहरातील महावीर पेठेमध्ये राहणार्‍या अक्षत राजेश ओसवाल या 19 वर्षांच्या युवकाने 43 दिवसांत 36 दिवस कडक उपवास करून सिद्धी तप व्रत केले होते. या तपाची सांगता शहरातून शोभायात्रा काढून सांगता करण्यात आली.अक्षत ने 36 दिवस केवळ गरम पाणी घेऊन उपवास केले. त्याच्या सांगतेच्या वेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांची उपस्थिती होती. शहरातून शोभायात्रा काढली तेंव्हा फुटरमल ओसवाल, योगेश ओसवाल आदींसह अनेक जैन बांधव भगिनी उपस्थित होते. यावेळी साध्वी दिव्य प्रभाश्रीजी यांनी प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version