राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत अक्षया यादवची उत्कृष्ठ कामगिरी

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील खारघरमधील अक्षया यादव हिने सीआयइससीई नॅशनल स्पोर्ट्स स्पोर्ट्स एंड गेम्स स्पर्धेतील शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र एंड गोवा राज्याच्या संघाकडून खेळतांना चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सर्वत्कृष्ठ खेळाडू म्हणून तिला गौरविण्यात आले.

संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी करतांना 90 धावा काढल्या तर गोलंदाजीत 8 बळी घेतले, क्षेत्ररक्षणामध्ये तिने 7 झेल टिपले.आता आंतराष्ट्रीय शालेल्य क्रिकेट स्पर्धेत सुद्धा तिला संधी मिळणार आहे. अक्षयच्या चमकदार कामगिरी बद्दल रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक सह जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींकडून अक्षयाचे कौतुक होत आहे.

Exit mobile version