सावधान! पर्यटनस्थळांना सतर्कतेचा इशारा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
’जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, देशांतर्गत पर्यटनाचा करोना संक्रमणावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक मॉडल तयार करण्यात आलंय. यानुसार, पर्यटनांसाठी प्रसिद्ध असणार्‍या हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांत करोना संक्रमण फैलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

हिमाचल प्रदेशच्या आकडेवारीनुसार, सामान्य हॉलिडे सीझनममध्ये पर्यटकांमुळे राज्यात 40 टक्के नागरिकांची वाढ होते. ही परिस्थिती लक्षात घेतली तर सणासुदीच्या दिवसांत तिसर्‍या लाटेचा धोका 47 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबासोबत प्रवास करणारे नागरिक राहण्याच्या ठिकाणावर अधिक खर्च करतात. नागरिकांना पर्यटनासाठी देण्यात आलेली सूट तिसरी लाट उद्भवण्यासाठी पुरेशी असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक आयोजनांमुळे ही तिसरी लाट आणखीन घातक होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पर्यटकांनी जबाबदारी ओळखून आपला प्रवास करावा. कोव्हिड चाचणी करून निगेटिव्ह रिपोर्टसोबतच लसीकरणाचंही प्रमाणपत्र जवळ बाळगावं. प्रवासासंबंधीचा धोका कमी करण्यासाठी राज्यांना माहिती देण्यात यावी. तसंच नागरिकांना गरज नसताना प्रवास करणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Exit mobile version