जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अलिबाग अजिंक्य

| अलिबाग | प्रतिनिधी |
नुकत्याच झालेल्या अलिबाग मध्ये जय शतोकान कराटे अँड स्पोर्ट अकॅडमी या संस्थेने भरवलेल्या कराटे स्पर्धेमध्ये अलिबागच्या कराटेपटूंनी प्रथम पारितोषिक मिळवले. हे पारितोषिक राखीव पोलीस दलाचे पोलीस इन्स्पेक्टर शेख साहेब यांच्या हस्ते देण्यात आलेदुसरा क्रमांक पुणे खराडी या कराटे संघाला राष्ट्रीय महिला बॉडी बिल्डर पोलीस नाईक जयश्री चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. तृतीय क्रमांक कालभैरव पेझारी आंतरराष्ट्रीय कराटेपट्टू रायगड पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गावडे तसेच कुस्तीपटू राज्य सुवर्णपदक विजेत्या असावरी झेंडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

चतुर्थ क्रमांक महात्मा गांधी विद्यालय हाशीवरे या शाळेच्या विद्यार्थ्यांना फिल्म डांसर भरत जाधव यांच्या हस्ते देण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी पेण, पनवेल, अलिबाग, खोपोली, उरण, पुणे येथील एकूण 247 कराटेपटू सहभागी झालेले होते.प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल छोटी ट्रॉफी सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाटील कारले ,महिंद्र घासे नवगाव, कराटे संघटनेचे अध्यक्ष संतोष कवळे, रसिका मढवी राष्ट्रीय शालेय कराटेपट्टू काजल पाटील या मान्यवरांच्या स्ते देण्यात आले या स्पर्धेसाठी पंच म्हणून रोहन गुरव, जय कवळे,प्रथमेश पाटील ,काजल पाटील ,तनया मंचेकर, वेदिका कवळे ,मानसी पाटील ,मनीषा गुरुम, या पंचांनी उत्कृष्ट स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी पिंट्या गायकवाड, जयवंत पाटील कारले, ओमकार कवळे त्यांनी स्पर्धेसाठी आर्थिक मदत केली.

Exit mobile version