| अलिबाग | प्रतिनिधी ।
बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत गतका मार्शल आर्ट या खेळामध्ये अलिबाग तालुक्यातील महाजने गावातील कराटेपटू श्रमिका पाटील हिने रौप्यपदक प्राप्त केले आहे. तसेच, पेढांबे गावाची तन्मई पाटील हिनेदेखील रौप्यपदक प्राप्त केले आहे. त्याबद्दल जय शोतोका न कराटे अँड स्पोर्ट अकॅडमी तर्फे दोन्ही खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. रायगड पोलीस तथा कराटे ब्लॅक बेल्ट राष्ट्रीय पदक विजेत्या जिया चव्हाण, कराटे राष्ट्रीय खेळाडू आसावरी झेंडे व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष कवळे यांच्या हस्ते या दोघींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्रमिका व तन्मईचे आई-बाबा, हरीश पाटील, रोहन गुरव, सोनू कामी, वेदिका कवळे, स्वरा वारगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.