। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे रविवारी (दि.5) कराटे बेल्ट परीक्षा संपन्न झाली. या स्पर्धेत 24 मुली आणि 13 मुलांनी सहभाग घेतला होता. या परीक्षांमध्ये कराटे कता, कराटे फाईट तसेच सर्व बेसिक कराटे किक, डक वॉक, मनी वॉक, क्योटस सीट, अप्स फिजिकल हे सर्व प्रकार विद्यार्थ्यांनी करून दाखवले. यावेळी, प्रमुख पाहुणे क्राईम ब्रँच असिस्टंट इन्स्पेक्टर ए.डी. नदाफ तसेच कराटे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष कवळे, रायगड पोलीस नवनाथ गावडे, भारत खांडे, हरेश पाटील, रायगड पोलीस विश्वजीत पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बेल्ट देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नदाफ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धा तसेच ऑलिंपिक स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग होऊन आपले कला कौशल्य दाखवून सुवर्णपदक पर्यंत पोहोचावे. त्यांनी आपले, गावाचे, जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नाव मोठे करावे. विद्यार्थ्यांनी मोबाईल कमीत कमी वापर करावा. आपले शरीर अनमोल रत्न आहे. त्यामुळे, सर्वांनी मैदानी खेळ खेळा. दिवसातून दोन ते तीनवेळा अंगातून घाम निघेल एवढा सराव करा, म्हणजे आपले शरीर सुदृढ बनेल, निरोगी रहील आणि आपली बुद्धिमत्तादेखील वाढेल, असेदेखील नदाफ यांनी सांगितले.