अलिबागचे कब्रस्तान उजळले

जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून हायमास्ट
मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग मुस्लिम समाज कब्रस्तान येथे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून बसवण्यात आलेल्या हायमास्ट लाईट चे उद्याटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष डॉ प्रशांत नाईक, नसीम बुकबाईंडर, इकबाल सय्यद, शेकाप शहर चिटणीस अशोक प्रधान, नियाज सय्यद इम्तियाज पल्लवकर, फरीद सय्यद, सभापती अजय झुंजारराव, राकेश चौलकर, नगरसेवक अनिल चोपडा, ड. गौतम पाटील, उमेश ( बाळू ) पवार, मुसद्दीक चौधरी, इर्शाद सय्यद, जमाल सय्यद,रऊफ सय्यद, मुश्ताक दरवेश यांच्यासह अलिबाग मुस्लिम समाजातील सर्व जेष्ठ, श्रेष्ठ व तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हायमास्ट लावण्यात आल्याने कब्रस्तान उजळून निघाले आहे.मुस्लिम समाजाने याबद्दल आम.जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.मुस्लिम समाजाने नेहमीच शेकापला साथ दिलेली आहे.त्यांच्या विविध मुलभूत समस्या सोडविण्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहू,अशी ग्वाहीही आ.जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
अल्पसंख्याक समाजातील बहुसंख्य समाजाने संरक्षण करणे आवश्यक आहे. अशी आपली प्रामाणिक भूमिका आहे. रायगडात अद्यापही हिंदु-मुस्लिम दंगल कधीही झाली नाही. कल्याणमध्ये जोपर्यंत शेकापचे वर्चस्व होते तोपर्यंत तिथे हिंदु-मुस्लिम दंगल झाली नव्हती. पण शेकापचे अस्तित्व कमी झाल्यावर कल्याणमध्ये नेहमीच हिंदु-मुस्लिम दंगली होत गेल्या, याचेही स्मरणही जयंत पाटील यांनी केले. मला अलिबागच्या मुस्लिम समाजाचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे. हे सर्वजण समाजासाठी एकत्र येताना दिसत आहे. नईमा सय्यद या मुस्लिम समाजातील उत्कृष्ट नगरसेविका असल्याचा गौरव जयंत पाटील यांनी केला आहे. गरीब समाजाची कामे व्हावीत यासाठी त्या प्रयत्नशील राहिलेल्या आहेत. यापुढेही मी सार्वजनिक कामासाठी आणि मुस्लिम समाजाच्या कटिबद्ध असल्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

Exit mobile version