। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ईद-उल-फित्रच्या पावन अवसर निमीत्ताने इकरा एज्युकेशन सोसायटी अलिबागच्या सौजन्याने व अलिबाग मुस्लिम समाजाच्या वतीने, जिल्हा शल्य चिकीत्सक डॅा.सुहास मानेंच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. मुस्लिम समाजाने या अवसराचे औचित्य साधुन समाजिक बांधिलकी, एकोपा व बंधुत्वाचा संदेश दिला. सदर कार्यक्रमास जमाल सय्यद, रमजान सय्यद, फारुक सय्यद, नसीम बुकबाइंडर, कैसर दनदने, गनी बागवान, अॅड.जुनैद घट्टे, सज्जाद पल्लवकर, मन्नान धनसे आदी उपस्थित होते.