अलिबाग पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग पंचायत समितीच्या सदस्य पदांसाठीचे आरक्षण गुरुवारी (दि.28) जाहीर करण्यात आले. सारळ गणासाठी अनुसूचित जमाती महिला, 68 शहापूरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शहबाज अनुसूचित जमाती महिला, कूर्डुस सर्वसाधारण, कामार्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, खंडाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, आवास व मापगाव, वरसोली सर्वसाधारण महिला, थळ, चेंढरे सर्वसाधारण, कुरुळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चौल अनुसुचित जमाती सर्वसाधारण, रामराज सर्वसाधारण, नागाव महिला, बेलोशी सर्वसाधारणसाठी जाहिर करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयातील सभागृहात संपन्न झाला.

Exit mobile version