अलिबाग पोलीस निरीक्षक के.डी कोल्हे यांची बदली; शैलेश सणस यांची नियुक्ती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केरुभाई दत्तात्रय कोल्हे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश दत्तात्रय सणस यांची नेमणूक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करून बदली करण्यात आलेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

Exit mobile version