। सारळ । वार्ताहर ।
ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी आता रायगड डाक विभागाने अलिबाग मुख्य डाक घर बारा तास ग्राहकांसाठी चालू ठेवण्यास सुरूवात केली आहे. याची सुरवात वटपौर्णिमेपासून अलिबाग मुख्यडाकघर येथे झाली आहे. यातून ग्राहकांना आपली वेळ सांभाळून गर्दी नसताना डाक विभागाच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. बचत बँक आणि बहुउद्देशीय खिडकी रजिस्ट्रर, पार्सेल या सर्व सेवा बारा तास ग्राहकांसाठी चालू राहणार आहेत. लोकाभिमुख सरकारी योजना राबवणारे पोस्ट ऑफिस नेहमी ग्राहकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई क्षेत्रातील ठाणे, पनेवल यासोबत ग्रामीण भागातील अलिबाग मुख्य डाकघर या ठिकाणी सुद्धा हि सेवा उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. संजय लिये अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग यांनी केले आहे.