। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लोककला सेवक संस्था महाराष्ट्र कला मंच मुंबई आयोजित मृदुंग ढोलकी वादन स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून काव्य राकेश मोरे व त्याचा भाऊ वेध रोशन मोरे रामराज या दोघांचा द्वितीय नंबर आला.
त्या प्रित्यर्थ रविवारी सायंकाळी पाच वाजता रामराज येथे झेप फाऊंडेशन अध्यक्षा तथा रा. जि. प. सदस्या चित्रा पाटील यांनी रोख रक्कम रुपये 15 हजार- व राज फाऊंडेशन सामाजिक संस्था नांगरवाडी वतीने सन्मानचिन्ह देऊन लहान कलाकारांचे कौतुक करण्यात आले. यावेळी अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती आरती पेडवी, पंचायत समिती सदस्य सौ. रचना म्हात्रे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश धुमाळ यांनी केले. यावेळी राज फाऊंडेशन अध्यक्ष राज रमेश धुमाळ उपस्थित ग्रामस्थ नंदू गावडे, विनीत झावरे, संतोष झावरे, सोहम वागले उपस्थित होते.