। अलिबाग । वार्ताहर ।
सालाबादप्रमाणे अलिबाग स्पोर्ट्स चषक 2022 स्पर्धेचे आयोजन परहूरपाडा येथे केले होते. या स्पर्धा 28 ते 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन शेकापक्षाचे माजी सरपंच जनार्दन घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदविला. श्री गणेश थळ-चाळमळा संघ हा या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक जय हनुमान बेलपाडा या संघाने पटकाविला, तृतीय क्रमांक गावदेवी गोंधळपाडा तर, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झालखंड ब हा संघ ठरला. या स्पर्धेचा मालिकावीर राहुल पेडणेकर (गावदेवी गोंधळपाडा), उत्कृष्ट फलंदाज नयन तुपे(झालखंड ब), उत्कृष्ट गोलंदाज पवन कोंडाजी (श्री गणेश थळ-चाळमळा), सिक्सर किंग हर्षल पाटील ( जाखमाता परहुरपाडा), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्मितेज ठाकूर (जय हनुमान बेलपाडा) यांना देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन अलिबाग स्पोर्ट्सचे अक्षय घरत व सिध्देश पाटील यांनी केले होते. या स्पर्धेसाठी ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग स्पोर्ट्स चषक 2022 स्पर्धेत श्री गणेश थळ-चाळमळा संघ विजेता
