। माणगाव । वार्ताहर ।
अनिकेत घोसाळकर मित्र परिवार आयोजित भगवा चषक भव्य दिव्य चौरंगी कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या खेळविण्यात आलेल्या सामन्यांत प्रिमियम ताडवागले अलिबाग संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून घाणेकरीणमाता दासगाव संघ द्वितीय क्रमांक, माऊली स्पोर्ट्स पाली तृतीय क्रमांक तर सेंन्ट्रल रेल्वे पुरस्कृत यशवंत ग्राफीक्स संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
26 व 27 फेब्रुवारी शनिवार व रविवार रोजी आयोजित कबड्डी सामन्याचे उद्घाटन आ. भरत गोगावले व गोरेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले अनिल नवगणे प्रमोद घोसाळकर अमृता हरवंडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. कबड्डीचा चौरंगी सामना असल्याने या खेळासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबई उपनगरातल्या नामांकित संघानी व खेळाडूंनी यांत सहभाग घेऊन तमाम माणगाव तालुक्यांतील कबड्डी रसिक प्रेमींचे मन खेळाच्या माध्यमातून जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विशेष म्हणजे महिलांचा आमंन्त्रीत सामना देखील खेळविल्याने कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
यावेळी सुजित शिंदे, गजानन अधिकारी, निवास बेंडखळे, प्रकाश हरवंडकर, महेंन्द्र तेटगुरे, राम टेंबे, विकास गायकवाड, जुबेर अब्बासी, अरुणा वाघमारे, प्रताप घोसाळकर, जगदिश भोकरे, मंगेश कदम, रवी टेंबे, श्रृती कालेकर, विनोद बागडे, नथुराम बामणोलकर, प्रदीप गोरेगावकर यांच्यासह तमाम गोरेगाव विभागातील कबड्डी प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.