। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
शिव सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित ग्रामपंचायत प्रीमियर लीग तिवरे 2022 चे आयोजन 26, 27 फेब्रुवारी रोजी सोमजाई क्रीडांगण पेडली येथे करण्यात आले होते. या प्रीमियर लीगमध्ये तिवरे ग्रामपंचायतमधील आठ संघमालकांचे आठ संघ सहभागी झाले होते. प्रीमियर लीगचे आयोजन केल्यामुळे ग्रामपंचायतमधील नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. या प्रीमियर लीगचा अंतिम सामना संघ मालक संदीप ठाकूर यांचा वंश नैतिक वाँरियर्स विरुद्ध साईनाथ भारती यांच्या शुभ्रा एंटरप्राइजेस या दोन संघात झाला. या प्रीमियर लीगचा प्रथम क्रमांकाचा मानकरी वंश नैतिक वाँरियर्स तर उपविजेता शुभ्रा एंटरप्राइजेस हा संघ ठरला.प्रथम मानकरी संघास एकतीस हजार आणि आकर्षक चषक तर द्वितीय मानकरी संघास एकवीस हजार आणि आकर्षक चषक देवुन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर प्रवीण कडू या खेळाडूस सायकल तर उत्कृष्ट फलंदाज रोहित देशमुख आणि उत्कृष्ट गोलंदाज अजय देशमुख यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणाच्या वेळी मिलींद देशमुख,सुलोचना देशमुख, मयूर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.







