ब्रेकिंग! अलिबाग शहराचा पाणीपुरवठा आज बंद; नागोठण्याजवळ जलवाहिनी ब्रेक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागोठणे येथे जलवाहिनी ब्रेक झाल्याने एमआयडीसीकडून अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आज (दि.25) दिवसभर पाणीपुरवठा बंद राहिल. तसेच एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर दि. 26 मे व 27 मे रोजी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. अपव्यय करु नये असे आवाहन अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version