आज अलिबागचा पाणीपुरवठा बंद; पुढिल 2 दिवस होणार कमी दाबाने पुरवठा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जलपाडा येथे दुरुस्तीचे काम निघाल्याने मंगळवारी अलिबाग शहराला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.18) सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवार (दि.19) व गुरुवारी (दि.20) शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले आहे.

Exit mobile version