। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राजमळाजवळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम निघाल्याने अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शनिवारी (दि.26) सायंकाळी शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहील. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी दि.27 व 28 नोव्हेंबर रोजी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती अलिबाग नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. अपव्यय करू नये, असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले आहे.