9.30 पर्यंत 15 टक्के मतदान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 1233 पैकी 186 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारीनुसार 15 टक्के मतदान झाले आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/04/मतदान-1024x768.jpeg)
80 वर्षांचे श्रीरंग घरत यांनी बजावला मतदानाचा हक्क
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागांपैकी 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 11 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 6, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 3 तर हमाल/मापारी मतदार संघात महविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे. 29 एप्रिल रोजी सायंकाळी मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.