| सोगाव | वार्ताहर |
दी लाईफ फाऊंडेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य विद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.9) सकाळी 7:30 वाजता अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियान कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आबेडकर समाजकार्य विद्यालय धुळे विद्यालयाचे 40 विद्यार्थी व प्राध्यापक डॉ. राजेन्द्र बैसाने, डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. आम्रपाली सूर्यवंशी आणि दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, प्रणय ओव्हाळ, राखी राणे, आदींनी मेहनत घेऊन समुद्र किनारा कचरा मुक्त केला. तसेच प्लास्टिक मुक्त पर्यावरण निर्मितीची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी 9 गोणी प्लास्टिक कचरा व 3 गोणी काचेच्या बाटल्या गोळा करून अलिबाग नगरपालिकेच्या कचरा घंटागाडीमध्ये व्हिलेवाट लावण्यासाठी देण्यात आल्या. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांनी उपस्थित पर्यटकांना कचरा न करण्याचे आवाहन करण्यात आले.