अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचा स्नेहमेळावा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचा ‘आम्माकॉन 2026’ हा स्नेहमेळावा अलिबागजवळील सह्याद्री लॉन येथे साजरा करण्यात आला. या मेळाव्यात अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यातील 200 डॉक्टर्स त्यांच्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते.

सांस्कृतिक, शैक्षणिक, स्नेहभोजन अशा या आम्माकॉन 2026 च्या या स्नेहमेळाव्यासाठी विद्यार्थी कल्याण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत, सचिव डॉ. ओमकार पाटील, खजिनदार डॉ. वैजेश पाटील, डॉ. रेखा म्हात्रे. उपाध्यक्ष डॉ. अमेय केळकर व डॉ. अमित बेणकर, सहसचिव डॉ. भूषण शेळके, डॉ. सुलतान हसवारे, सह खजिनदार डॉ. अभिराज पाटील, डॉ. प्रांजली पाटील, मेंटर डॉ. संदेश पाटील, सांस्कृतिक सचिव डॉ. समीर धाटावकर, डॉ. सोनाली नाईक, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. रश्मी गंभीर, डॉ. आदेश मोकल, डॉ. पल्लवी शेळके, माजी अध्यक्षा डॉ. सुनीता पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉ. महेंद्र दोशी, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. खानावकर, डॉ. मकरंद आठवले, डॉ. अनघा भगत, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. गणेश गवळी, डॉ. उज्वल जैन, डॉ. सुनिता पाटील यांचा असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना उपयुक्त पडेल, अशी माहिती असलेल्या डॉ. आशिष भगत व डॉ. श्वेता बागडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्राशी निगडित वस्तूचे स्टॉलदेखील या ठिकाणी लावण्यात आले होते. तर अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत वृक्ष लागवड, विविध प्रकारची मोफत आरोग्य शिबीर राबवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रहाणार असल्याचे मनोगत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत यांनी व्यक्त केले. कर्यक्रमाची प्रस्तावना डॉ. संदेश पाटील यांनी केली. आभार प्रदर्शन डॉ. रश्मी गंभीर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सोनाली नाईक यांनी केले.

Exit mobile version