| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जे.एस.एम. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) व कर्मचारी कल्याण समिती आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी मेडिकल हेल्थ चेक अप कॅम्पचे आयोजन दि. 7 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या मुख्य स्टेजवर करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील व उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, जेएसएमचे प्रा. डॉ. अनिल पाटील, अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, सेक्रेटरी डॉ. प्रणाली पाटील, खजिनदार डॉ. रेखा म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. साक्षी पाटील यांनी हेल्थ चेकअप कॅम्पचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौरी लोणकर यांनी केले. त्यांनी शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले. यानंतर डॉ. साक्षी पाटील यांनी आरोग्याचे महत्त्व विशद केले. डॉ. गणेश गवळी यांनी रेग्युलर चेकअप सर्वांसाठी किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सीमंतिनी ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.
या शिबिरात एकूण 72 शिक्षकांनी आपले चेकअप करून घेतले. यामध्ये रेग्युलर चेकअप, ब्लड शुगर, डेंटल चेकअप, सीबीसी, बोन डेनसिटी, युरिक अॅसिड लेव्हल, स्किन चेकअप, ऑक्सिजन लेव्हल इ. गोष्टींच्या टेस्ट करण्यात आल्या. यानंतर अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राहुल शर्मा यांनी रिपोर्ट पाहून औषधे लिहून दिली व व्यायामाचे निरनिराळे प्रकार करायला सांगितले.