अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग प्रेस असासिएशनतर्फे देण्यात येणारे तेजस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सौ.चंद्रकला कुमार कदम, सुवर्णा गणेश खाड्ये , जान्हवी विनोद पाटील, सोनाली राजेंद्र तेटगुरे, आणि तनिषा मंदार वर्तक यांची 2024 सालच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या परंतु प्रसिध्दीपासून दूर असलेल्या कर्तृत्ववान महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गेल्या 16 वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जातो.

यंदाचा तेजस्विनी पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (दि.7) सकाळी 10 वाजता आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीबाग-अलिबाग येथील आदर्श भुवन या मुख्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला अलिबाग येथील रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुखे, रायगडा जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तेजस्विनी पुरस्कार विजेत्या चंद्रकला कदम या नावाजलेल्या चित्रकार आहेत. पोलीस हवालदार सुवर्णा खाड्ये यांनी दोन अपहरणकर्त्यांना जेरबंद केले आहे. जान्हवी पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोनाली तेटगुरे यांनी एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. तर धनुर्विद्या क्रीडा प्रकारात तनिषा वर्तक यांनी राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे.

Exit mobile version