| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग प्रेस असासिएशनतर्फे देण्यात येणारे तेजस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सौ. राजश्री भगवान जाधव, सौ. मनीषा रमेश अहिवले पवार, गार्गी हरेश ठाकूर, अॅड . गीता दर्शन म्हात्रे, ऐश्वर्या रवींद्र समेळ, कॅप्टन कृतज्ञा हाले यांची 2023 सालच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या परंतु प्रसिध्दीपासून दूर असलेल्या कर्तृत्ववान महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा तेजस्विनी पुरस्कार वितरण समारंभ 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीबाग – अलिबाग येथील आदर्श भुवन या मुख्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.