। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्री नारायण महाराज, श्री दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट, श्री क्षेत्र नारायणपूर, तालुका- पुरंदर, जिल्हा- पुणे यांच्यावतीने श्री दत्त जयंतीनिमित्त अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडीचे प्रस्थान अलिबाग येथून मोठ्या उत्साहात प्रस्थान करण्यात आले. यंदा हे दिंडीचे 31 वे वर्ष असून अलिबाग शहर व तालुका परिसरातून सुमारे 300 दत्तभक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. अलिबाग एसटी आगारातील श्री गणेश मंदिरामध्ये अभिषेक-पूजा, आरती करून दिंडी समुद्रकिनारी पोहोचेली. तेथे गंगा- सागरपूजन, पादुकापूजन, कलश व कावड सागर तीर्थाने भरून पालखी मार्गस्थ झाली. अलिबाग बाजारपेठ, कोळीवाडा, चेंढरे, पिंपळभाट येथे विश्रांतीसाठी ही पालखी थांबली होती. यावेळी वैभव घरत परिवाराच्यावतीने पालखीची पुजा करुन स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.







