अलिशान कप २०२३ चे चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

सोगांव | प्रतिनिधी |

अलिशान सोगांव क्रिकेट संघाने आयोजित केलेल्या मरहूम सुझाऊद्दिन काझी (मामु) पुरस्कृत अलिशान कप २०२३ पर्व १० वे च्या भाव रात्रीच्या प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धांचे शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धा सोगांव क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी चित्रलेखा पाटील यांच्याहस्ते पहिल्या सामन्यांचे नाणेफेक करण्यात आले. यामध्ये पहिला सामना अल अझीझ अलिबाग संघ व स्वर्गीय उमेश थळे पुरस्कृत क्रिकेट संघ यांच्यात नाणेफेक होऊन आलं अझीझ संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण घेत स्वर्गीय उमेश थळे पुरस्कृत बहिरोळे संघाला फलंदाजी ची संधी दिली.
या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मापगांव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मजीद कुर, ज्येष्ठ नागरिक कुतबुद्दीन कप्तान, माजी सदस्य लाईक कप्तान, कमाल वाकनिस, अनिल भगत आदी मान्यवर उपस्थित होते. यास्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

Exit mobile version