शोकसभेत मान्यवरांकडून आठवणींना उजाळा
उरण | वार्ताहर |
उरणच्या विकासात नगराजशेठ यांचे मोठे योगदान असून,त्यांच्यासारखा नेता या शहराला पुन्हा लाभला नाही,अशा शब्दात उरणच्या सर्वपक्षीय नेतेमंडळींनी माजी नगराध्यक्ष नगराज शेठ यांना आदरांजली वाहिली.
साईसंस्था डोंबिवली आणि नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल उरणच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी आम.मनोहर भोईर, नरेश रहाळकर, सुधाकर पाटील, भूषण पाटील, नरसू पाटील, जनार्दन भोईर, महादेव बंडा, महेंद्र ठाकूर, सीमा घरत,गौरी देशपांडे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपॉल ज्योती म्हात्रे, उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगराजशेठ यांच्या कार्याला आपल्या अनुभवांतून उजाळा देत त्यांना द्धांजली अर्पण केली. सूत्रसंचलन रमाकांत गावंड यांनी केले.







