| सोलापूर | प्रतिनिधी |
सोलापूर-विजापूर महामार्गावर सोलापूरच्या अलीकडे तेरा मैलजवळ एक जीप झाडावर आदळून भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये तिघाजणांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. किशोर आण्णाराव भोसले (वय 45, सळई मारूती मंदिराजवळ, उत्तर कसबा, सोलापूर), नितीन भगवान भांगे (वय 32, रा. निराळे वस्ती, मुरारजी पेठ, सोलापूर) आणि व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45, रा. मोदीखाना, सोलापूर) अशी या अपघातातील तिघा मृतांची नावे आहेत. तर राकेश हुच्चे (रा. सोलापूर) हा जखमी झाला. हे चौघेजण स्कार्पिओ गाडीतून दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गेले होते.







