| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
आंबेडकराईट बुद्धिस्ट कम्युनिटी पर्थ ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष मनोज कासारे आणि बौध्दजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष किशोर मोरे यांच्या प्रयत्नाने विभागातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे. सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा दिघी, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी कार्याध्यक्ष किशोर मोरे,सरचिटणीस लक्ष्मण भगत , प्रकाश मोरे , रवींद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.तर झूम मीटिंग द्वारे ऑस्ट्रेलिया येथून जॉइंट सेक्रेटरी रवी मरियप्पा,मानसी गुप्ता,सुधीर चौधरी,सर्वेश माळी,नीलेश गणवीर मान्यवर उपस्थित होते. रुग्णवाहिके साठी संपर्कसाठी राजेश कासारे. 9273231050,श्रीनिवास नागावकर 9579268622,सतेंद्र कासारे 8087414397 सुदर्शन जाधव 7758076426 आदि कार्यकर्त्यांना संपर्क करण्याचे आवाहन किशोर मोरे यांनी केले आहे.