‘या’ हायस्कूलला सायकल वाटप

मुंबई रोटरीचा उपक्रम
दांडगुरी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथील रा.पा.दिवेकर दांडगुरी हायस्कूलमधील 30 मुलांना रोटरी क्लब ऑफ मुंबई रॉयल्स यांच्या वतीने शनिवारी सायकलचे वाटप करण्यात आले. याशिवाय शाळेला 2 ओव्हरहेड प्रोजेक्टर देखील देण्यात आले.

या वेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई चे सुनील मेहरा व शिल्पी मेहरा, प्रदीप पानसरे, आशिष अगरवाल, प्रकाश व संगीता रुईया तसेच सुरेश बजाज यांच्या सहकार्याने येथील विद्यार्थाना सायकली वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्यधापक अर्जुन नामदे , स्थानिक शाळा समिती सदस्य श्रीकांत शेलार, कृष्णकांत लाड, तमनर सर, जगणर सर, खोत सर, गवळे मॅडम, तोडणकर मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते तसेच अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version