| उरण | वार्ताहर |
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणतर्फे विधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी बांधवांना मच्छिमारीसाठी सहा बोटींचे वाटप उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या हस्ते बुधवारी (दि.7) करण्यात आले. कठंवली गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांना मच्छिमारीसाठी बोटी प्राप्त झाल्या. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरसन यांचे लाभार्थी आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून आभार व्यक्त केले.
उरण तालुक्यातील नामदेव ठाकूर, राजेंद्र मढवी, बी.एम ठाकूर विविध वाड्यातील आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणचे अधिकारी सुहास साळसकर, निसर्गा बाकी, बी.एम.ठाकूर, राजेंद्र मढवी, ज्ञानप्रकाश पाटील, नामदेव ठाकूर, लाभार्थी आदिवासी बांधव नितीन अनंत कातकरी, देवीदास कातकरी, रवि कातकरी, दिपक कातकरी, सुनील कातकरी, संजय कातकरी सह आदिवासी बांधव उपस्थित होते.