माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा उत्साहात

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे स्वर्गीय नामदेव शेठ खैरे सभागृहात शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथील बीपीएडच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार, (दि.19) मे रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, सुएसो सचिव रविकांत घोसाळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश सुतार, राष्ट्रीय पंच भगवान शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीप गुरव, प्राचार्य संभाजी ढोपे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थी पी.जी. धनवे यांनी आपल्या प्रास्ताविकात आम्ही सर्व मित्र कोरोनाच्या काळात एकत्र आलो. आज पर्यंत आमच्या बॅचचे 90 टक्के शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. आमच्या बॅचचा आज तिसरा स्नेहमेळावा रायगडच्या भूमीत होत आहे, याच मला खूप आनंद होतो आहे. आमच्या बॅचच्या शिक्षकवृंदानी राष्ट्रीयपातळीवर असंख्य खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. या बॅचच्या माजी विद्यार्थी बागमारू यांनी सर्व उपस्थित मित्रांना स्नेहपूरक भेट म्हणून सोलापूर चादर दिली. या कार्यक्रमादरम्यान बॅचच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला, शिक्षक म्हणून आलेले अनुभव सांगितले तसेच यातील बहुसंख्य मित्रांना जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, हे त्यांच्या मनोगतातून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन निमत्रक संभाजी ढोपे यांनी केले. त्यांचे त्यांच्या मित्रपरिवाराकडून विशेष कौतुक करण्यात आले. माजी विद्यार्थी सुजित जगताप यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Exit mobile version