को.ए.सो. लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थीनींचा सन्मान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
को.ए.सो.महिला महाविद्यालय पेझारी येथे नुकताच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती निमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाने मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालय स्थापनेच्या पहिल्या वर्षाची माजी विद्यार्थिनी गीता भोईर – पाटील तसेच माजी विद्यार्थिनी जिविता पाटील यांना महाविद्यालयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करून समाजापुढे एक आदर्श दाखवून दिला.


सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमंत्रित माजी विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात प्रमुख वक्त्या गीता भोईर पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख सांगून कॉलेज जीवनातल्या काही गंमतीशीर अनुभव सांगून जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षणाविषयी प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच प्रमुख वक्त्या व माजी विद्यार्थिनी जिविता पाटील यांनी प्रत्येक स्त्रीने ध्येय, जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर अडचणींवर मात केली पाहिजे असा सल्ला उपस्थित विद्यार्थिनींना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ.दिलीप पाटील यांनी माजी विद्यार्थींच्या कार्याची ओळख करून देत आजपर्यंत कॉलेजमधून यशस्वीरित्या शिक्षण घेत चांगल्या पदांवर कार्यरत असणार्‍या माजी विद्यार्थिनींची उदाहरणे उपस्थित विद्यार्थिनींना देत मोलाचे मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर पध्दतीने सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. भटू वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन निहा पाटील या विद्यार्थिनीने केले.

Exit mobile version