माजी विद्यार्थ्थांचे स्नेहसंमेलन

| अलिबाग | वार्ताहर |

कोएसो वा.ग.रानडे हायस्कूल थळ 1987 एसएससी बॅचच्या विद्यार्थ्थांचे स्नेह संमेलन रविवार 30 एप्रिल रोजी घेण्यात आले. अकरा वाजता शाळेची घंटा वाजवून संमेलनाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन मीना दाते- जोशी, वनिता सुर्वे, श्रीनाथ कवळे, रविंद्र म्हात्रे, विध्याधर पैठणकर, अनिता गुजांळ, शैला मयेकर- आंब्रे याच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीनाथ कवळे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. वंदे मातरमने कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, शिपाई साळुंखे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version